Raju Shrivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी राजू श्रीवास्तव यांचे पीआरओ गरवीत नारंग यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, राजू यांचा लहान भाऊ देखील एम्समध्ये दाखल असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू यांचा भाऊ काजू श्रीवास्तव यांनाही एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या कानाखाली असलेली झालेली गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या 3 दिवसांपासून ते एम्समध्ये दाखल आहेत, मात्र राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात नाही. 


राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्समधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्डियाक युनिटच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचवेळी तिसऱ्या मजल्यावर काजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत.


राजू श्रीवास्तव जिममध्ये सकाळी वर्कआऊट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलमधून समोर आलेली माहिती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली ज्यामध्ये मोठ्या भागात 100% ब्लॉकेज आढळले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, त्यामुळे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.