नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या नावाचे स्पेलिंग चुकिचे लिहिल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान नोटीस जारी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ डिसेंबरला राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांच्याविरोधात ट्विटरवर टिप्पणी केली होती. जेटली यांच्या नावाच्या स्पेलिंगसोबत त्यांनी छेडछाड केली होती. यावर भाजपातर्फे आक्षेप नोंदविण्यात आला. 


विशेषाधिकारांची पायमल्ली 


राहुल गांधी राज्यसभेचे सदस्य नसल्याने नियमानुसार राज्यसभा त्यांना नोटीस पाठवू शकत नाही.



विशेषाधिकारांची पायमल्ली केल्याची नोटीस राहुल यांना पाठविण्यात आली. 


विचार करु 


शुक्रवारी सत्राच्या शेवटच्या दिवशी सभापती वैंकेय्या नायडू यांनी यावर भाष्य केले. हा विषय माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामूळे लोकसभेत हा विषय पाठविण्याबाबत विचार करणार असल्याचे ते म्हणाले.