Rakesh Jhunjhunwala यांनी या कंपनीचे 1 कोटी शेअर केले खरेदी; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक शेअर जोडला आहे.
मुंबई : दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक शेअर जोडला आहे. जूनच्या तिमाहीमध्ये Indiabulls Housing Finance शेअर्सची खरेदी केली आहे.
शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझूनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक शेअर वाढवला आहे. जून तिमाहीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नच्या मते त्यांनी यादरम्यान Indiabulls Housing Finance मध्ये खरेदी केली आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी इंडियाबुल्समध्ये भागीदारी वाढवली आहे. कंपनीची 2.2 टक्के भागीदारी त्यांनी विकत घेतली आहे. त्यांनी कंपनीचे 1 कोटी स्टॉक्स खरेदी केले आहेत. ज्यांची वॅल्यू 266 कोटी रुपये आहे. ही माहिती बाहेर येताच इंडियाबुल्सच्या शेअरमध्ये दमदार उसळी पाहायला मिळाली.
SAIL मध्येही खरेदी
राकेश यांनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच SAIL चे देखील स्टॉक्स खरेदी केले आहे. सेल मध्ये राकेश यांची आता 1.4 टक्के भागीदारी आहे. या शेअर्सची सध्याची वॅल्यू 706 कोटी रुपये आहे.