मुंबई : Rakesh Jhunjhunwala Portfolio : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला स्टॉक वाबाग (Rakesh Jhunjhunwala Portfolio:) मध्ये कमाईची चांगली संधी आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीमध्ये कंपनीचा निकाल चांगला राहिला आहे. वाबाग एक पूर्णतः वाटर ऍंड वेस्ट ट्रिटमेंट सोल्युशन प्रोवाइडर कंपनी आहे. चांगले आऊटलूक पाहता ब्रोकरेज फर्म नोमुरा(Nomura)ने स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत 8 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.


VA Tech Wabag वर ब्रोकरेजचा सल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

VA Tech Wabagच्या शेअर्सवर ब्रोकरेज फर्म नोमुराने खरेदीचा सल्ला दिला आहे. सोबतच लक्ष्य 581 रुपयांनी वाढून 634 रुपये करण्यात आले आहे. सध्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 320 रुपयांच्या आसपास आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, कंपनीचे तिसऱ्या तिमाहीच्या निकाल चांगले राहिले आहेत. तिमाही दरम्यान कंपनीचे कर्ज कमी झाले आहे. मार्जिनच्या हिशोबाने कंपनीचा नफा उत्तम आहे.


वाटर टेक्नॉलॉजी स्पेसच्या या कंपनीचा निव्वळ  नफा 45 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 38 कोटी रुपये होता.