Ayodhya Ram Mandir: राममंदिरासंदर्भात मोठी बातमी.... अयोध्येतील (Ayodhya) राममंदिराची (Ram Mandir) तारीख ठरलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीच राममंदिराच्या तारखेसंदर्भात मोठी घोषणा केलीय. 1 जानेवारी 2024ला अयोध्येतलं राममंदिर पूर्ण होणार आहे. राममंदिराचा मुद्दा काँग्रेसनं (Congress) झुलवत ठेवला, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. राममंदिरासंदर्भात काँग्रेस फक्त कोर्टकचेऱ्यांमध्ये गुंतून राहिलं. पण सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) राममंदिराबद्दलचा निर्णय येताच पंतप्रधान मोदींनी (PM Modi) भूमिपूजन केलं. आणि आता 1 जानेवारी 2024 मध्ये राममंदिर प्रत्यक्षात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिर उभारणीचं काम अंतिम टप्प्यात
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. राम मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जानेवारी 2024 पासून राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्रतिमेची पूजा केली जाईल अशी अपेक्षा आहे. राम मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्येच्या सुशोभीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि चौकही नव्या पद्धतीने तयार केले जात आहेत. रामभक्तांना मंदिर उभारणीच्या प्रगतीची जाणीव व्हावी यासाठी ट्रस्टकडून काही फोटो जारी करण्यात आली होते.


असं असेल राम मंदिर
भव्य राम मंदिरात एकूण 12 दरवाजे असतील. हे सर्व दरवाजे सागवान लाकडाचे असतील. जानेवारी 2024 पासून भाविकांना रामललाचे भव्य मंदिरात दर्शन घेण्यास सुरुवात होणार आहे.  मंदिराच्या गर्भगृहात 160 खांब बसवण्यात आले आहेत. जो मंदिराचा आधार असेल. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर 132 खांब असतील. त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावर 74 खांब बसवण्यात येणार आहेत. आतापर्यंत राम मंदिराच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. राम लल्लाच्या गर्भगृहाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. अष्टकोनी गर्भगृहात आतापर्यंत पाचशे मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत.गर्भगृह तयार करण्यात सुमारे 500 कारागीर आणि मजूर गुंतले आहेत.


400 खांबांवर उभं असणार तीन मजली राममंदिर
राममंदिराच्या बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) वापर करण्यात येत आहे. सुमारे 400 पिलर्सवर तीन मजली राममंदिर उभं राहाणार आहे. कुशल कारीगिरांकडून मंदिरांच्या खांबावर रामकथेतील प्रसंग मूर्ती रुपात चित्रित करण्यात येणार आहे. खांबांवर एकूण 6400 मूर्ती असणार आहेत. त्यामुळे मंदिराला ऐतिहासिक रूप प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या खांबावर देवी-देवताच्या एकूण 16 मूर्ती कोरण्यात येणार आहे. दरम्यान, आधी राम मंदिराच्या कळसाची गाभाऱयापासूनची उंची 128 फूट ठेवण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर ती 161 फूटापर्यंत वाढवण्यात आली आहे. 6 फुटांच्या दगडांच्या भिंती आणि मंदिराला संगमरवरी दरवाजे बसवण्यात येणार आहे.


राममंदिराच्या इतिहासावर बनवार चित्रपट...बिग बी देणार आवाज 
राममंदिरच्या पाचशे वर्षांच्या संघर्षमय इतिहासावर चित्रपट बनवण्याची ट्रस्टची योजना आहे. दूरदर्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाला बॉलिवूडचा (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आपला आवाज देणार आहेत. याबाबत चित्रपट सेंसर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चित्रपटासाठी अमिताभ बच्चन आणि प्रसून जोशी कोणतेही शुल्क घेणार नाही.