अयोध्येतलं राममंदिर कसं असेल, राम मंदिराच्या मॉडेलचं अनावरण
अयोध्येतलं राममंदिर कसं असेल, याची एक्सक्लूझिव्ह दृश्यं समोर आले आहे.
अयोध्या : अयोध्येतलं राममंदिर कसं असेल, याची एक्सक्लूझिव्ह दृश्यं समोर आले आहे. प्रयागराजमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या शिबिरात प्रस्तावित राम मंदिराच्या मॉडेलचं अनावरण करण्यात आलं. अयोध्येतल्या या प्रस्तावित राम मंदिराची लांबी २६८ फूट, रुंदी १४० फूट असेल. तर हे मंदिर १२८ फूट उंच असेल. राम मंदिरात दोन मजले असलीत. दोन्ही मजल्यावर प्रत्येकी १०६५ खांब असतील.
या मंदिरात सिंह मंडप, रंग मंडप आणि कोली मंडप असेल, गर्भगृहाच्या चारही बाजूला प्रदक्षिणा मार्ग असेल. मंदिराच्या खालच्या भागात रामलल्ला विराजमान असतील. रामाबरोबर अर्थातच लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मूर्ती असेल.
राममंदिराबरोबरच या परिसरात एक वेद पाठशाळा बांधण्यात येणार आहे. तसंच एक गोशाळा आणि धर्मशाळाही या परिसरात असेल. ४५ एकर जागेत रामकथा कुंज बांधलं जाणार आहे. ज्यामध्ये रामकथेचं प्रवचन सुरू राहणार आहे. १२५ मूर्तींच्या माध्यमातून पूर्ण रामायण दर्शनही घडवलं जाणार आहे.