नवी दिल्ली: देशातल्या सात राज्यांमध्ये नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यपाल राजवट लागू असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये एन एन व्होरांच्या जागी सत्यपाल मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मलिक सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. मलिक यांच्या जागी बिहारच्या राज्यपालपदी उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांची नियुक्ती करण्यात आलीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली.


सत्यदेव नारायण आर्य  हरियाणाचे राज्यपाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारचे भाजपचे नेते सत्यदेव नारायण आर्य यांना हरियाणाचे राज्यपाल बनवण्यात आलंय.  तर हरयाणाचे विद्यमान राज्यपाल कप्तानसिंह सोळंकी यांना त्रिपुराच्या राज्यपालपदाची धुरा सोपवण्यात आलीय. त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल तथागत रॉय यांना मेघालयचं राज्यपाल पद देण्यात आलंय तर  मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालीय. 


उत्तराखंडाचे राज्यपाल  बेबी रानी मोर्य 


दरम्यान, उत्तराखंडाचे राज्यपाल के के पॉल यांचा कार्यकाळ संपल्यानं आता त्यांच्या जागी बेबी रानी मोर्य यांना राज्यपाल बनवण्यात आलं आहे.