नवी दिल्ली : सीबीआयने डेरा सच्चा सोदा प्रमुख रामरहिम विरोधात धक्कादायक खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहिम संपत्ती गोळा करण्यासाठी भक्तांना नपुसंक बनण्यासाठी प्रेरित करायचा, असे सीबीआयच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.


पंचकूलाच्या विशेष न्यायालयात सीबीआयने ही चार्जशीट दाखल केली आहे.


भक्त अनभिज्ञ


सीबीआयच्या म्हणण्यानुसार, राम रहीम भक्तांना नपुसंक केल्यानंतर त्यांना पूर्णपणे आपल्या वशमध्ये करायचा, त्यांना आपल्या हेतूबद्दल न सांगता सह्या घ्यायचा.


त्याचे भक्तही त्याला या सह्यांबद्दल विचारत नसत.  डेराच्या नावे रामरहीमने महागडी गिफ्ट आणि संपत्ती खरेदी केली. याबद्दल त्याने भक्तांना अज्ञानात ठेवले. 


'डेऱ्या'ला गिफ्ट


 राम रहीमच्या समर्थकांच्यानाावे प्रथम जमीन खरेदी केली गेली. त्यानंतर 'डेऱ्या'ला गिफ्ट करण्यात आली.


जमीनीचा खरा खरेदीकर्ता ( बाबा भक्त) कधीच जमीन विक्रेत्याला भेटला नाही.