नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील ३ वर्षापासून ते बिहारचे राज्यपाल आहेत. रामनाथ कोविंद हे दलित समाजाचे असून ते मुळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला अमित शाह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू हे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना देण्यात आले होते.


भाजपनं आपल्या सर्व खासदारांची सोमवार आणि मंगळवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत या खासदारांना राष्ट्रपतीपद निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडीत प्रस्तावक आणि अनुमोदक यांच्यात आमदारांचाही समावेश असतो. त्यामुळे २० तारखेच्या बैठकीला भाजपचे आमदारही उपस्थित असतील. या संदर्भातील सगळ्या प्रक्रिया २० जूनला पार पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार २३ जूनला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जूनला अमेरिकेला रवाना होण्याआधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं बोललं जातं आहे.