नवी दिल्ली : ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्लीतलं राष्ट्रपती भवन तिरंग्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालं आहे. १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनावर खास तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.


रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा पहिलाच स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून पहिलंच भाषण केलं. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयाचं स्वागत करतानाच, २०२२ पर्यंत नवा भारत निर्माण करण्याचा संकल्प राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.