Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली असावी, असे त्याने म्हटले आहे. पीडित इसमाने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.


2009 मध्ये झाला होता विवाह 


कान्हाई पंडित हा साहिबगंजच्या बंझी बाजारचा रहिवासी आहे. 2009 मध्ये त्याचे तेलोबथन गावातील रहिवासी असलेल्या कल्पना कुमारीसोबत लग्न झाले. लग्नानंतर सर्व काही ठीक होते. पत्नीने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. कान्हाईने देखील याला परवानगी दिली. सुरुवातीला पत्नीने इंटरना आणि नंतर जमशेदपूरच्या नर्सिंग कॉलेजमध्ये एएनएम कोर्सला प्रवेश घेतल्याचे कान्हाईने सांगितले. 


आपण स्वत: पत्नीसह जमशेदपूरच्या नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलो होतो. तसेच दोन लाख रुपये रोख फीदेखील भरली. यानंतर पत्नी कल्पनाने येथे दोन वर्षे एएनएमचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती कान्हाईने दिली. 


गुजरातहून परतल्यानंतर पत्नीने आपल्यासोबत राहण्यास नकार दिल्याचे तो सांगतो. आपण प्रवेश आणि शिक्षण शुल्कासाठी 2 लाख रुपये खर्च केले होते, या काळात कर्जबाजारी झालो. मला मजूर म्हणून गुजरातला जावे लागले, अशी व्यथा त्याने पोलिसांसमोर मांडली. 


इकडे पत्नीला साहिबगंज येथील नर्सिंग होममध्ये नोकरी लागली. गेल्या एप्रिलमध्ये गुजरातहून परतल्यानंतर पत्नीने सोबत राहण्यास नकार दिला आणि 10 एप्रिल रोजी आपल्या 10 वर्षाच्या मुलाला घेऊन ती निघून गेली. तेव्हापासून मी तिच्या शोधात भटकत आहे. सासरचे लोकही बायकोबद्दल काहीच सांगत नसल्याची माहिती कान्हाईने दिली.


इकडे कल्पनाचे आई-वडील जयंती देवी आणि राजकिशोर पंडित यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे. कन्हाई त्यांच्या मुलीला मारहाण करायचा. हुंड्यासाठी दबाव आणायचा, असा आरोप त्यांनी कान्हाईवर केला आहे. पोलीस अजूनही दोन्ही बाजू पडताळून पाहत असून प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.