नवी दिल्ली : राफेल कराराप्रकरणी काँग्रेसने गोव्यातील भाजप सरकारच्या मंत्र्यांची ऑडीयो क्लिप जारी केली आहे. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे याच्यातील राफेल प्रकरणावरील ऑडीयो क्लिप समोर आली आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ही क्लिप माध्यमांसमोर आणत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. राफेल करारासंबंधी साऱ्या फाईल माझ्याकडे असल्याचे यामध्ये पर्रिकर विश्वजीत राणेंना सांगत असल्याचे या कथित ऑ़डीयो क्लिपमध्ये ऐकू येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफेलचे कंत्राट अंबानींनाच मिळावे ही अट पंतप्रधान मोदींनीच ठेवल्याचे पर्रिकर म्हटल्याचे या कथित ऑडीओ क्लिपमध्ये आहे. या सर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे असे सुरजेवाला यांनी सांगितले आहे. पंतप्रधानांनी आपल्या 55 महिन्याच्या कार्यकाळात रणनितीच्या बाबतीत देशाला बर्बादीच्या सिमेवर नेल्याचेही ते म्हणाले. आता तुमचे 100 दिवस राहिले आहेत. तुम्ही 55 महिन्यांआधी जे आश्वासन दिले होते ते पूर्ण कराल अशी जनतेला आशा होती पण तसे झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 


'पर्रिकर मासे घेत होते'


10 एप्रिल 2015 ला ज्यावेळी चौकीदाराने फ्रांसमध्ये राफेल खरेदीची एकतर्फी घोषणा केली तेव्हा तात्कालीन संरक्षणमंत्री पर्रिकर हे गोव्यामध्ये मासे खरेदी करत होते. चौकीदराच्या प्रातिनिधिक मंडळात पर्रिकर सहभागी नव्हते तर सोबत अंबानी गेले होते असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.


कॉंग्रेसचे 3 प्रश्न 


मनोहर पर्रिकरांकडे राफेल संदर्भात कोणते रहस्य आहे ? राफेलच्या फाईलमध्ये असा कोणता भ्रष्टाचार, गडबड आहे ? ज्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न चौकीदार करताहेत. भ्रष्टाराच्या याच कहाणीमुळे चौकीदार संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) च्या मागणीला बगल देत आहे का ? असे 3 महत्त्वाचे प्रश्न सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहेत.