मुंबई  : भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वेराज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच  महत्त्वाची घोषणा केली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास बंदी घातली आहे. पण रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा चार्ज घेताचं लोकलबद्दल महत्त्वाची घोषणी केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लोकलबद्दल दानवे म्हणाले, 'जेव्हा राज्याला वाटेल कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे. तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य आभ्यास करून त्याठिकाणी रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. राज्य सरकारने विनंती केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु' असं म्हणत दानवे म्हणाले