मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल (Simi Garewal) यांची जितकी चर्चा ही 'कर्ज' आणि 'मेरा नाम जोकर' सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयामुळे झाली, तितकीच चर्चा त्यांच्या लव्ह लाईफची झाली होती. सिमी यांनी तीन महिने लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बिझनेसमन रवी मोहनसोबत लग्नबंधनात अडकल्या. पण त्यांचं हे लग्न काही काळचं टिकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही सविस्तर : 'Hero ला नग्न दाखवू शकत नाही, पण स्त्रीला नग्न दाखवले तर…'; स्मिता पाटील यांचे 'ते' वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत


लग्नापूर्वी सिमी गरेवाल या जामनगरच्या महाराज यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यावेळी त्या फक्त 17 वर्षांच्या होत्या. पण फार कमी लोकांना माहित असेल की सिमी गरेवाल एकेकाळी रतन टाटा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. सिमी गरेवाल यांनी एका मुलाखतीत रतन टाटा यांच्यासोबतच्या त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने सांगितले. 


हेही वाचा : साडी की टेबल क्लॉथ? Kriti Sanon ला पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न


सिमी गरेवाल यांनी 11 वर्षांपूर्वी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्या रतन टाटा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघे बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. रतन टाटांचे कौतुक करताना सिमी गरेवाल म्हणाल्या की, 'रतन आणि माझं खूप पूर्वीचे नाते आहे. ते एकदम पर्फेक्ट आहेत. त्यांची विनोदबुद्धी अप्रतिम आहे आणि ते पर्फेक्ट जेन्टलमन आहेत. त्यांच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता. ते परदेशात जेवढे आरामात राहतात तितके ते भारतात राहत नाही.



रिपोर्ट्सनुसार सिमी गरेवाल आणि रतन टाटा यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. दोघांनीही अनेक स्वप्ने पाहिली होती. पण काही कारणास्तव ते जमलं नाही. यानंतर रतन टाटा सिमी गरेवाल यांच्या शो Rendezvous with Simi Garewal मध्ये देखील दिसले, जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टीं उघडपणे सांगितल्या. त्यानंतर रतन टाटा यांनी लग्न आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले होते की, 'असे अनेक प्रसंग आले होते जेव्हा ते लग्न करणार होते. पण काही कारणांमुळे ते झालं नाही.' 


हेही वाचा : आलिया भट्ट पाळणार कपूर कुटुंबाची प्रथा? बाळाच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीला रामराम?


सिमी गरेवाल यांनी रतन टाटांसोबत ब्रेकअप का केलं हे कधीच सांगितलं नाही, पण तरीही त्या त्यांचा आदर करतात. सिमी गरेवाल या बऱ्याचवेळा रतन टाटा यांचे कौतुक करतात. सिमी गरेवाल या मन्सूर अली खान पतौडीसोबतही रिलेशनशिपमध्ये होत्या. पण मन्सूर पतौडी यांच्या आयुष्यात शर्मिला टागोर यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाते तुटल्याचे म्हटले जाते. सिमी गरेवाल 1979 मध्ये त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि त्या अजूनही अविवाहित आहे.



सिमी गरेवाल यांनी 1988 मध्ये चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. 1997 मध्ये, त्यांनी Rendezvous with Simi Garewal हा हिट शो आणला, जो खूप लोकप्रिय झाला. सिमी गरेवाल या 2011 पासून शोबिजपासून दूर असल्या तरी त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.