Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी टाटांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या जवळच्या लोकांना हा धक्क पचवणं जड जातंय. शांतनू नायडू हा तरुण रतन टाटा यांच्यासोबत अखेरच्या क्षणापर्यंत होता. शांतनू नायडू हा टाटांसोबत सावलीसारखा वावरत होता. टाटांच्या मृत्यूनंतर शांतनू नायडू आता नेमकं काय काम करणार? हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांतनू नायडू हा रतन टाटांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांचा मित्र व सहाय्यक म्हणून तो ओळखला जातो. रतन टाटा आणि शांतनू नायडू यांच्यातील मैत्रीचा समान धागा म्हणजे दोघांचेही समाजावर असलेले प्रेम. दोघांची पहिली ओळख 2014 साली झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री होती. रतन टाटांच्या शेवटच्या काही दिवसांत शांतनूच त्यांच्यासोबत होता. 


शांतनू नायडू हे टाटा ऑफिसमध्ये जनरल मॅनेजरच्या पदावर काम करतो. तसंच, नव्या स्टार्टअप्ससाठी टाटा ग्रुपला गुंतवणुकीसाठी सल्ले देतो. इतकंच नव्हे तर शांतनूचे स्वतःची एक संस्था आहे. तसंच, तो लेखकदेखील आहे. त्याने I Came Upon A Lighthouse हे पुस्तक लिहलं आहे. यात त्याने त्याच्या व रतन टाटांच्या मैत्रीबद्दल लिहलं आहे. त्यांच्या नात्याबद्दल सविस्तर लिहलं आहे. 



रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर शांतनू नायडू कंपनीत राहणार का? असं प्रश्न सध्या चर्चेत आहे. मात्र, रतन टाटा यांनी आधीच शांतनूवर एक मोठी जबाबदारी दिली होती. शांतनू हा एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. गुडफेलो या संस्थेचा संस्थापक आहे. गुडफेलो हा एक स्टार्टअप असून या माध्यमातून वृद्धांना युवकांसोबत जोडण्यात येते. या अॅपचा मुख्य उद्देश हा आहे की, वृद्ध नागरिकांना त्यांच्या रोजच्या कामात मदत व्हावी. जसं की, किराणा सामान खरेदी करणे, औषधांची व्यवस्था करणे, डॉक्टरांकडे नेणे याप्रकारेच वृद्धांची मदत करणे. तर दुसरीकडे युवकांना आयुष्याचे धडे शिकण्याची संधी देण्यात येते. गुडफेलो या संस्थेत रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. मात्र, टाटा यांनी किती गुंतवणुक केली आहे, हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. वृद्धांसाठी टाटा यांनी खूप मोठं पाऊल उचललं आहे.