Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी
Ration Card Rules: जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. रेशन कार्ड असूनही तुम्ही त्यावर रेशन घेत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
मुंबई : Ration Card : जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. रेशन कार्ड असूनही तुम्ही त्यावर रेशन घेत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अलीकडेच, उत्तर प्रदेश सरकारने शिधापत्रिका रद्द करण्याचा कार्यक्रम सुरु केल्याची बातमी आली होती. शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार शिधापत्रिकांच्या यादीतून अपात्रांची नावे वगळण्यात येणार असून केवळ गरजूंनाच मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे.(Ration Card Rules)
कार्ड रद्द झाल्यानंतर दुसरे बनविणे सोपे नाही !
पण रेशनकार्डशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा नियम आहे. कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती नसेल. नियमानुसार, जर शिधापत्रिकाधारक तीन महिन्यांपर्यंत शासकीय धान्य घेत नसेल, तर त्याचे शिधापत्रिका रद्द करण्यात येते. एकदा शिधापत्रिका रद्द झाली की ते बनवणे तुम्हाला सोपे जाणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे शिधापत्रिका असल्यास त्यावर दरमहा सरकारी रेशन घेणे आवश्यक आहे.
शिधापत्रिका बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशात विविध जिल्ह्यांमध्ये अशा शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली जात आहे, जे मागील तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ कार्डद्वारे रेशन घेत नाहीत. 2011 च्या जनगणनेनुसार रेशन कार्ड बनवण्याचे टार्गेट पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत नवीन शिधापत्रिका दिले जात नाही. रेशनकार्ड बनवण्यासाठी दररोज हजारो लोक ब्लॉक आणि जिल्हा मुख्यालयात फेऱ्या मारत आहेत.
रेशनकार्डवर दर महिन्याला दोन वेळा धान्य
रेशनकार्डवर दर महिन्याला दोनदा रेशन मिळते. नवीन शिधापत्रिका बनवण्यासाठी आणि जुनी शिधापत्रिका रद्द करण्यासाठी हा नियम लागू करण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून रेशन न घेतलेल्या कार्डधारकांची पडताळणी करून पुरवठा विभाग कार्ड रद्द करेल. यासोबतच त्यांच्या जागी पात्र लोकांचे कार्ड बनवले जाणार आहेत. कार्डधारकांना महिन्यातून दोनदा रेशन मिळते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एका व्यक्तीला पाच किलो रेशन दिले जात आहे.