नवी दिल्ली : रेशन कार्डावर मोफत अन्नधान्य घेणाऱ्यांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे.  सरकारकडून अपात्र असणाऱ्यांना रेशन कार्ड सरेंडर करण्यासाठी वारंवार सांगितलं जात आहे. अनेक रेशन कार्डधारक मोफत मिळणाऱ्या आणि रेशन योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांनी रेशन कार्ड जमा करावा, असं आवाहन सरकारने केलं आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तरांखड सरकारकडून हे आवाहन करण्यात आलंय. (ration card government has become strict on free ration if such people do not surrender card then fir will be registered)


दुकानाबाहेर लाभार्थ्यांच्या नावाची यादी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमध्ये खाद्य विभागाच्या 'अपात्र को ना-पात्र का हां' या अभियानानुसार अनेकांनी आतापर्यंत रेशन कार्ड सरेंडर केले आहेत. उत्तराखंडच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी ही या अभियानाची समिक्षा केली.


"प्रत्येक शिधा दुकानाबाहेर लाभार्थ्यांच्या नावाची यादी लावण्यात येईल. तसेच ज्या भागातून अपात्र रेशन कार्ड सरेंडर केलं जाईल, त्याच भागातील पात्र अर्जदाराचं रेशन कार्ड बनवलं जाईल", असं आर्य यांनी स्पष्ट केलं.


31 मे पर्यंत अल्टिमेटम


"मासिक 15 हजारांपेक्षा अधिक वेतन असलेले रेशन कार्डधारक हे अंत्योदय आणि राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र नसतील. अशा रेशन कार्डधारकांना 31 मे पर्यंत आपलं कार्ड सरेंडर करावं लागणार आहे. 31 मे पर्यंत रेशन कार्ड जमा न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. 1 जूनपासून अपात्र कार्डधारकांविरोधात कारवाई केली जाईल. तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल", असंही आर्य यांनी स्पष्ट केलं.


उत्तरप्रदेशात आवाहनाला प्रतिसाद 


दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्येही अपात्रांना रेशन कार्ड जमा करण्यासाठी सांगितलं आहे. सरकारच्या या आवाहनालाही जनतेने जोरदार प्रतिसाद देत अपात्र रेशन जमा केले आहेत.


या अभियानानुसार अपात्र असलेल्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच आतापर्यंत घेतलेल्या अन्नधान्याची रक्कम वसूलही करण्यात येणार आहे.