मुंबई : Ration Card: शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून सातत्याने सुविधा दिल्या जात आहेत. आता सरकार अशा सुविधेवर काम करत आहे, त्यानंतर तुम्ही रेशनकार्डशिवाय गहू-तांदूळ इत्यादी रेशन घेऊ शकणार आहात. ही सुविधा प्रथम उत्तर प्रदेशात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल.


कार्डशिवाय मिळेल रेशन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असण्याची गरज नाही, असे संसदेत सरकारच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी संसदेत सांगितले होते की, आता शिधापत्रिकाधारकांना रेशन घेण्यासाठी कार्ड दाखवण्याची गरज नाही.


सरकारने देशात 'वन नेशन, वन रेशन कार्ड'ची सुविधा सुरू केली आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 77 कोटी लोक 'वन नेशन, वन रेशन कार्ड'शी जोडले गेले आहेत. यानंतर लोक जिथे राहतात तिथे जवळच्या रेशन दुकानात जाऊन रेशन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक देऊन रेशन मिळवू शकतात. 


केंद्र शासित प्रदेशासह 35 राज्यांचा सामावेश


पियुष गोयल यांनी सांगितले होते की नवीन तंत्रज्ञानामुळे रेशन देण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यांनी असेही सांगितले होते की 77 कोटी लोकांपैकी रेशन कार्ड वापरकर्ते एकूण संख्येपैकी 96.8 टक्के आहेत. यामध्ये केंद्रशासित प्रदेशांसह 35 राज्यांतील लोकांचा समावेश आहे.


केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते की, जर एखाद्या व्यक्तीचे रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्याचे असेल आणि तो नोकरी किंवा कुटुंबासोबत इतर कामानिमित्त दुसऱ्या शहरात किंवा राज्यात राहत असेल, तर तो रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन रेशन देऊ शकतो. . यासाठी शिधापत्रिकेची मूळ प्रत दाखविण्याची गरज भासणार नाही.