अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये रावण दहनाच्यावेळी भीषण अपघात झाला आहे. रावण दहनाच्या वेळी रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही जण रेल्वे रूळावर उभे होते. याच वेळी रेल्वे रूळावर उभ्या असलेल्यांना रेल्वेने उडवलं आहे. झी मीडियाच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत स्थानिकांनी ३० मृतदेह घटनास्थळी पाहिलेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे ट्रॅकजवळच धोबी घाटाजवळ रावण दहनाचा कार्यक्रम होता, हा कार्यक्रम पाहण्यासाठी हे लोक रेल्वे रूळावर गर्दी करून उभे होते, याच दरम्यान डीएमयू आणि हावडा रेल्वेगाडीने ३० पेक्षा जास्त जणांना चिरडलं आहे.


मृतांमध्ये महिला, लहान मुलं, तरूण आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. एका सेकंदात घटनास्थळी मृतदेहांचा सडा पडल्यासारखी स्थिती झाली आहे.


मृतांच्या जवळच्या नातेवाईकांनी जीवाचा आकांत केला आहे. प्रशासनालाही काय करावं हे प्रथम कळत नव्हतं. येथे २ रेल्वे लाईन क्रॉस होतात, म्हणून याला जोडा फाटक देखील म्हणतात.


एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लोक गाफील राहण्याचं कारण म्हणजे हे फाटक अपघाताच्या वेळी उघडंच होतं, म्हणून लोकांना गाडी येणार नाही असंच वाटलं, पण होत्याचं नव्हतं झालं, अचानक गाडी आली आणि मृतदेहांचा खच पडला.