मुंबई : ATM मधून अनेकदा रोख रक्कम काढणं पडणार महागात. रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने  ATM मधून फ्री लिमिटनंतर पैसे काढल्यास तुम्हाला अधिकचे चार्ज भरावे लागणार आहे. (RBI Allows Banks To Raise Charges For ATM Withdrawals)  RBI ने बँकांवरील वाढतं प्रेशर पाहता ATM ट्रांझेशनवरील चार्जमध्ये वाढ केली आहे. याचा सरळ फटका ग्राहकांना पडणार आहे. 


ATM मधून पैसे काढणं पडलं महागात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ग्राहकांना आपल्या बँकेतील ATM मधून महिन्याला फक्त 5 वेळा मोफत पैसे काढता येणार आहे. तर मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या बँकेंच्या ATM मधून 3 वेळा ट्रांझेशन मोफत करू शकतो. नॉन मेट्रो शहरात दुसऱ्या बँकेतून ATM मधून 5 वेळा ट्रांझेशन फ्री आहेत. 


या फ्री टांझेशनच्या लिमिटमध्ये वित्तीय आणि गैर वित्तीय दोन्ही व्यवहार सहभागी होते. यानंतर ग्राहक ATM मधून कोणत ट्रांझेशन करत असतील तर प्रत्येक ट्रांझेशनकरता 21 रुपये आकारले जाणार आहे. जे आतापर्यंत 20 रुपये होते. RBI मार्फत जाहीर केलेल्या सर्कुलरनंतर ग्राहकांना हा दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.  


ATM इंटरचेंज फीमध्ये देखील वाढ 


यासोबतच RBI ने ATM वर लागणारे आणि त्यांच्या मेन्टेनेसवर होणारा खर्च पाहता 9 वर्षांनंतर इंटरचेंज फीसवर देखील वाढ केली आहे. RBI ने इंटरचेंज फीमध्ये वाढ केली आहे. हा दर 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. तर दुसऱ्या चार्ज 5 रुपये ते 6 रुपयांपर्यंत आकारण्यात आहेत. 


काय असते इंटरचेंज फी


जर एका बँकाचा ग्राहक दुसऱ्या बँकेच्या ATM मधून ट्रांझेशन करतो तेव्हा कार्ड असलेली बँक ज्या ATM मधून पैसे काढले त्याला फी देते. ज्याला इंटरचेंज फी दिली जाते. आता या इंटरचेंज फी करता आर्थिक व्यवहाराकरता 15 रुपये आणि इतर ट्रान्झेशनकरता 5 रुपये आकारत होते. आता ही फी वाढली असून 17 रुपये आणि 6 रुपये अशी असणार आहे.