रेपो रेट कमी झाल्याने ईएमआयमध्ये इतक्या रुपयांची बचत
होमलोन असलेल्या लोकांसाठी गुडन्यूज
नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षात आरबीआयने रेपोरेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट केली आहे. रेपोरेट हा तो दर असतो ज्यावर आरबीआई बँकांना कर्ज उपलब्ध करुन देते. याआधी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये RBI ने व्याजदरांमध्ये ०.२५ टक्क्यांनी दर कमी केले होते. २०१९ मध्येRBI ने रेपो रेटमध्ये ०.५ टक्के दर कमी केले आहेत. ज्याचा सरळ परिणाम हा होमलोनच्या EMI आणि व्याजदरांवर होतो. CRR ४ टक्के कायम आहे.
रेपोरेट कमी केल्यामुळे ईएमआयवर किती परिणाम
लोन - २५ लाख
मुदत - २० साल
व्याजदर - ८.५%
सध्या EMI - २१,६९६ प्रति महिना
रेपो रेट ०.२५ टक्के कमी झाल्याने व्याज दर ८.२५ टक्के झाला.
आता EMI २१,३०२ रुपये प्रति महिना होईल
बचत ३९४ रुपये प्रति महिना
२०१७ नंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये घट केली आहे. रेपोरेट ६.५० टक्क्यावरुन ६ टक्के झाला आहे.
काय आहे रेपो रेट?
रेपो रेट हा तो दर असतो ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. रेपो रेट कमी केल्यामुळे आरबीआयकडून मिळणार कर्ज स्वस्त होणार आहे. याचा सरळ फायदा ग्राहकांना देखील होईल. कमी व्याज दरामुळे आता लोन ऑफर केले जातील. जने आणि नवे सगळे लोन स्वस्त होणार आहेत.