Paytm ऍपवर UPI चालू ठेवण्यासाठी RBI ने सुचवला पर्याय, NPCI घेणार निर्णय
Paytm App News: आरबीआयने आपल्या आदेशात NCPI ला पेटीएमच्या UPI सेवेचे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मदत करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते थर्ड पार्टी बँकांशी त्यांचे व्यवहार सहज करू शकतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी लिंक असेल तर 15 मार्च नंतर चालणार नाही. मात्र ही सेवा सुरु ठेवण्यासाठी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना आपल्या पेटीएम यूपीआयला कोणत्या तरी अन्य बँकेशी लिंक करायला हवे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन लिमिटेड याकरता 4 ते 5 बँकांशी संपर्क साधणार आहे.
Paytm Payment Bank बाबत मोठी अपडेट
RBI ने NPCI ला पेटीएमची UPI सेवा कायम ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. पेटीएम यूपीआय वापरणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्रीय बँकेने एनपीसीआयला मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत की, पेटीएम ऍपमधून सेवा कायम राहिल, यासाठी NPCI पेमेंट सर्व्हिस प्रोवाइडर म्हणून हाय वॉल्यूम यूपीआय ट्रांजेक्शनची क्षमता असलेल्या बँकांच्या सर्टिफिकेशनची सुविधा दिली जाणार आहे. RBI ने NPCI या डिजिटल पेमेंटच्या ऑपरेशनवर देखरेख करणाऱ्या संस्थेला @paytm हँडल इतर नवीन बँकांमध्ये स्थलांतरित करण्यास सांगितले आहे.
त्याच वेळी, RBI ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ला पेटीएमच्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) विनंतीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय बँकेने एनसीपीआयला आदेश दिले आहेत की, ते एक नियमावली जाहीर करणार आहेत. त्यानुसार पेटीएम ऍपच्या युपीआय ऑपरेशनला सुरु ठेवण्यासाठी TPAP च्या अर्जावर निर्णय घ्या.
आरबीआयने एनपीसीएलला सूचना दिल्या
याशिवाय आरबीआयने आपल्या आदेशात NCPI ला पेटीएमच्या UPI सेवेचे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मदत करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ते त्यांचे Paytm UPI थर्ड पार्टी बँकेत सहजपणे विलीन करू शकतील. आरबीआयने म्हटले आहे की एनसीपीआय पेटीएम वापरकर्त्यांना 4 ते 5 बँकांचा पर्याय देईल ज्यामुळे युपीआय अकाऊंट नवीन बँकेशी लिंक करू शकतो. यूपीआय सर्व्हिसला15 मार्चपर्यंत तारीख वाढवून दिली आहे.
पेटीएमला 4-5 बँकांशी हातमिळवणी करावी लागेल
पेटीएम आणि ॲक्सिस बँकेने NPCI ला UPI व्यवसायासाठी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रदाता म्हणून काम करण्यास सांगितले. यूपीआयच्या व्यवहाराकरता पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे होत असल्यामुळे पेटीएमला सध्या टीपीएपीच्या रुपात वर्गीकरण केलं आहे. तर दुसरीकडे Amazon Pay, Google Pay, Mobikwik, PhonePe आणि WhatsApp सह 22 संस्थांच्या वर्तमानातील TPAP लायसेन्स आहे.