`ही` Bank 22 सप्टेंबरपासून होणार बंद; ग्राहकांच्या पैशाचे काय?
Reserve Bank Of India: : जर तुमचेही बँकेत खाते असेल तर जाणून घ्या रिझर्व्ह बँकने पुन्हा एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर या महिन्यापासून बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल.
RBI Cancelled Bank License: RBI ने आत्तापर्यंत अनेक बँका (banks) आणि वित्तीय संस्थांचा (financial institution) परवाना (license) रद्द केला आहे. पुन्हा एकदा आता आरबीआयने (Reserve Bank Of India) एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर या महिन्यापासून बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. RBI च्या या निर्णयानंतर ही बँक 22 सप्टेंबरपासून म्हणजेच या महिन्यापासून बंद होणार आहे.
RBI ने परवाना रद्द केला
ऑगस्टमध्ये RBI ने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank Limited) परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर 22 सप्टेंबरपासून या बँकेची बँकिंग सेवा बंद होणार आहे. ज्या ग्राहकांचे पैसे या बँकेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
परवाना का रद्द केला?
रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, बँक 22 सप्टेंबरपासून आपला व्यवसाय करणे बंद करेल. अशा परिस्थितीत ग्राहक ना पैसे जमा करू शकतील आणि ना काढू शकतील. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला कारण बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही. या कारणास्तव या बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे.
वाचा : JEE Advance Result 2022 चा निकाल जाहीर, आर के शिशिर देशभरात प्रथम
5 लाख रुपये मिळतील
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 11(1) आणि कलम 22(3)(d) तसेच कलम 56 चे पालन करत नाही. कलम 22(3)(a), 22(3)(b), 22(3)(c), 22(3)(d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. . DICGC कायदा, 1961 च्या तरतुदींच्या अधीन राहून, प्रत्येक ठेवीदाराला ₹ 5,00,000 (रुपये पाच लाख) पर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल.