JEE Advance Result 2022 चा निकाल जाहीर, आर के शिशिर देशभरात प्रथम

JEE Advanced 2022 Result Update: IIT Bombay ने JEE Advanced 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

Updated: Sep 11, 2022, 01:28 PM IST
JEE Advance Result 2022 चा निकाल जाहीर, आर के शिशिर देशभरात प्रथम title=

JEE Advanced 2022 Result : IIT बॉम्बेने संयुक्त प्रवेश परीक्षेचा (JEE Advanced 2022 Result) निकाल जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट या jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबतच JEE Advanced 2022 ची गुणवत्ता यादी देखील जाहीर करण्यात आली. यावर्षी दोन्ही पेपरसाठी एकूण 160038 उमेदवारांनी नोंदणी केली असून 155538 उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 40712 उमेदवार पात्र ठरले आहेत. यामध्ये बॉम्बे झोनच्या आर के शिशिरने IIT प्रवेश परीक्षेत जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये अव्वल क्रमांक पटकावला ( R K Shishir rank first ) आहे. ज्याचा निकाल आज रविवारी जाहीर करण्यात आला.

निकाल कसा तपासायचा?

jeeadv.ac.in या JEE Advanced च्या अधिकृत साईटला भेट द्या.
तुम्ही इथे थेट क्लिक करूनही निकाल पाहू शकता.
या पृष्ठावरील लॉगिन तपशील भरा आणि सबमिट करा.
तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
परिणाम तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा येथे.

जेईई अॅडव्हान्सचे टॉपर्स

आर के शिशिरने प्रथम - आयआयटी बॉम्बेने दिलेल्या माहितीनुसार, शिशिरने 360 पैकी 314 गुण मिळवले आहेत. तर दिल्ली विभागातील तनिष्का काबरा हिने 277 गुणांसह महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले ( Tanishka Kabra tops in the women list ) आहे. तिची ऑल इंडिया रँक 16 आहे. 1.5 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते. यात 40,000 हून अधिक उमेदवार पात्र ठरले आहेत.

वाचा : JEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार; 'असा' निकाल Download करा

ही आहे टॉप-10 ची यादी

1. आर के शिशिर
2. पोलू लक्ष्मी साई लोहित रेड्डी
3. थॉमस बिजू चिरमवेली
4. वंगापल्ली साई सिद्धार्थ
5. मयंक मोटवानी
6. पॉलिसेट्टी कार्तिकेय
7. प्रतीक साहू
8. धीरज कुरुकुंड
9. महित गढ़ीवाला
10. वेचा ज्ञान महेश