मुंबई : RBI Cancel License: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)  युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (United Co-Operative Bank Ltd.) परवाना रद्द केला आहे. पश्चिम बंगालच्या बगनानमध्ये या बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.


युनायटेड सहकारी बँकेचा परवाना रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परवाना रद्द झाल्यानंतरच 13 मे 2021 पासून युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लि.  (United Co-Operative Bank Ltd.) सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, पश्चिम बंगालच्या सहकारी संस्थांच्या कुलसचिव यांनीही बँक बंद करुन लिक्विडेटर नेमण्याचे आवाहन केले होते. रिझर्व्ह बॅंकेच्या या कारवाईमुळे सहकारी बँकेतील ठेवीदार आता बँकेत जमा केलेल्या पैशांचे काय होईल, त्यांना पैसे परत मिळतील की नाही याची चिंता आहे.


ग्राहकांच्या पैशांचे काय होईल?


रिझर्व्ह बॅंकेचे म्हणणे आहे की बँकेकडे पुरेसे भांडवल नाही किंवा भविष्यात पैसे मिळण्याचीही आशा नाही. जोपर्यंत बँकेच्या ग्राहकांचा प्रश्न आहे, बँकेच्या सर्व ठेवीदारांना संपूर्ण ठेव रक्कम जमा विमा  (Deposit Insurance) आणि पत गॅरंटी कॉर्पोरेशनमार्फत  (DICGC) परत केली जाईल. बँकेने ग्राहकांविषयी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण रक्कम सर्व ठेवीदारांना परत केली जाईल. तथापि, केंद्रीय नियमांनुसार जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंतची मर्यादादेखील पाळली जाईल. रिझर्व्ह बँकेने 18 जुलै 2018 रोजी युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडविरोधातही कारवाई केली. आता आरबीआयने बँकेला लेखी परवानगीशिवाय गुंतवणूक, कर्ज, योजनेच्या नुतनीकरण यासह अनेक सेवांवर बंदी घातली होती.


RBI सांगितले, म्हणूनच बंदी


रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ही बँक बँकिंग रेग्युलेशन  कायदा 1949 च्या (Banking Regulation Act, 1949) काही तरतुदी पूर्ण करु शकलेली नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेची आर्थिक जी स्थिती आहे, त्यामुळे ती आपल्या ठेवीदारांना पूर्ण रक्कम देऊ शकणार नाही. जर बँक आपले कार्य चालू ठेवत असेल तर ते ग्राहकांच्या हिताच्या विरुद्ध असेल. हे लक्षात घेऊन बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या सर्व कामांवर आणि व्यवहारांवर त्वरित बंदी घालण्यात आली आहे.


ठेव विमा म्हणजे काय


जेव्हा एखादी बँक बुडते किंवा त्याची आर्थिक परिस्थिती ढासळते तेव्हा त्याचे ठेवीदार काही प्रमाणात सुरक्षित असतात, ज्या नियमांतर्गत असे होते त्याला ठेव विमा म्हणतात. ठेव विमा संरक्षण संरक्षण एक प्रकार आहे. ती बँकेच्या ठेवीदारांना उपलब्ध आहे. सर्व प्रकारच्या बँक ठेवी डीआयसीजीसी अंतर्गत येतात. यामध्ये बचत, मुदत ठेवी, चालू खाती आणि आवर्ती ठेवी (आरडी) समाविष्ट आहेत.


5 लाख रुपयांपर्यंत रक्कम परत केली जाणार


याची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत आहे. म्हणजे केवळ बँकेत ग्राहकांच्या 5 लाख रुपयांपर्यंतची ठेवी सुरक्षित आहेत. जर तुमच्या एका बँकेत तुमची एकूण ठेव 5 लाखाहून अधिक असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपयांचे संरक्षण मिळेल. म्हणजेच, बँकेत बुडणे किंवा परवाना रद्द करण्याच्या बाबतीत, 5 लाखांपर्यंतची रक्कम ग्राहकाला परत केली जाईल. जरी बँकेत जमा केलेली रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल किंवा जास्त, मात्र, लाभ हा पाच लाखांपर्यंत मिळणार आहे.