नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची हकालपट्टी करण्यास बँकेला मंजुरी देण्याचा निर्णय योग्य आहे असा दावा रिझर्व्ह बँकेने बुधवारी केला. रिझर्व्ह बँकेला प्रतिवादी बनवण्याची परवानगी कोचर यांनी न्यायालयाकडे मागितली होती. ती मान्य करून न्यायालयाने रिझव्‍ र्ह बँकेला कोचर यांच्या सुधारित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्णय कुठल्याही अर्थाने मनमानी नव्हता, तर आयसीआयसीआय बँकेने केलेल्या विनंतीवर योग्य प्रकारे विचार करूनच घेण्यात आला होता असं रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.



कार्यालयावर धाडी


अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य अधिकारी चंदा कोचर तसंच व्हिडिओकॉन समूहाचे संचालक वेणुगोपाल धूत यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. बँकेच्या फसवणूक प्रकरणी ईडीनं या धाडी टाकल्यात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीनं मुंबईसह इतर ठिकाणी पाच कार्यालय आणि निवासस्थानांवर तपासणी केलीय. अंमलबजावणी संचालयानं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, वेणुगोपाल धूत आणि इतरांविरुद्ध 'मनी लॉन्ड्रींग' कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. 


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुराव्यांच्या शोधासाठी ईडीनं शुक्रवारी सकाळीच छापेमारीला सुरूवात केली. यामध्ये पोलिसांनी ईडीचीही मदत घेतली.