महागाई तीन महिने कायम राहणार, रेपो दरात ०.४ टक्क्यांची कपात - शक्तीकांता दास
कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई : कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. देशात गुंतवणूक अत्यंत कमी झाली आहे. तसेच अनेक राज्यांत औद्योगिक उत्पादन बंद झाले आहे. लाॅकडाऊन कालावधीत मागणी आणि उत्पादन दोघांतही कमतरता आली. याचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पुढील तीन महिने महागाई कायम राहणार असून त्यापुढील सहा महिन्यात महागाई कमी होईल, असे सांगत रेपो रेटमध्ये ०.४ टक्के कपात करण्यात आली आहे, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली.
यंदा मान्सून चांगला होण्याचा अंदाज आहे. देशात गुंतवणूक अत्यंत कमी झाली आहे. वीज आणि पेट्रोलियम वापरात कमतरता आली आहे. तर मार्चमध्ये सिमेंटचे उत्पादन १९ टक्क्यांनी कमी झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ०.४ बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी रेपो रेट संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये ४० बेसिक पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे.