RBI Penalty on Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ बँकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयकडून आठ सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील बँकांचाही सामावेश आहे. या कारवाईत सर्वात जास्त दंड गुजरातच्या मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव बँक वर 40 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मेहसाणा अर्बन को ऑपरेटिव बँकेला जबर दंड ठोठावला आहे. तसेच महाराष्ट्रातील इंदापूर अर्बन सहकारी बँकेला (indapur urban bank) 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


महाराष्ट्रातील वरुद अर्बन को ऑपरेटिव बँक (warud urban co-operative bank ltd),यवतमाळ अर्बन को ऑपरेटिव बँक (The Yavatmal Urban Bank Co-Op. Bank Ltd.) आणि


 मध्य प्रदेशातील छिंदेवाडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केवायसी(KYC)नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड लावण्यात आला आहे. 
 
 छत्तीसगडच्या राज्य सहकारी बँकेवर 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.