मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. या तिन्ही बँकांना आरबीआयने 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी दोन बँका महाराष्ट्रातील आणि एक पश्चिम बंगालमधील आहे. याआधी मार्चमध्येही रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने 8 बँकांना दंड ठोठावला होता.


आरबीआयची माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने एक अधिसूचना करून माहिती दिली की, 'फलटन येथील यशवंत सहकारी बँक लिमिटेडला उत्पन्न, मालमत्ता वर्गीकरण, तरतुदी आणि इतर समस्यांवरील सूचनांचे पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


तसेच, मुंबईस्थित 'कोकण मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडलाही 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच कोलकाता येथील समता सहकारी विकास बँकेलाही एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


यापूर्वीही 8 बँकांना दंड


याआधी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देखील 14 मार्च 2022 रोजी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हिमाचल आणि उत्तर प्रदेशातील 8 सहकारी बँकांवर 12  लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. 


चीनकडून डेटा शेअर


आरबीआयने चिनी कंपन्यांशी डेटा शेअर केल्यामुळे कठोर कारवाई करीत फिनटेक फर्म पेटीएमवर कारवाई केली होती. 11 मार्च रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करणारा आदेश जारी केला.