Bank Holidays In October 2022 : पुढील महिना ऑक्टोबर (October) आहे. या महिन्यात बँकेत कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ऑक्टोबर महिन्यातील (Bank Holidays In October 2022) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 21 बंद असणार आहेत. (rbi issues bank holiday october 2022 see full list and know which day bank closed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने या सुट्ट्यांची 3 श्रेणीत वर्गीकरण केलंय. यामध्ये  Negotiable Instruments Act, Real Time Gross Settlement Holiday और Banks Closing of Accounts समावेश आहे. याचच अर्थ असा की राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त प्रत्येक राज्यात विविध दिवशी विशेष सुट्ट्या असतात. या सुट्ट्यांमध्ये रविवारसह, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. ऑक्टोबरमध्ये नक्की कोणत्या कोणत्या दिवशी बँकेचे व्यवहार बंद राहणार, हे आपण जाणून घेऊयात.


ऑक्टोबरमध्ये या दिवशी बँक बंद (Bank Holidays in October 2022)


1 ऑक्टोबर – बँकचं अर्धवार्षिक क्लोजिंग (देशभरात)
2 – रविवार आणि गांधी जयंती 
3 – महाअष्टमी (दुर्गा पूजा)  (आगरतला, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाल, कोलकाता, पटना आणि रांची)
4 – महानवमी/श्रीमंत शंकरदेव का जन्मोत्सव (आगरतला, बंगलुरु, भुवनेश्वर, गुवाहाटी,  कोलकाता, चेन्नई, गंगटोक, कानपुर, कोच्चि, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलांग आणि तिरुवनन्तपुरम)
5  – दुर्गा पूजा/दसरा (विजयादशमी) 
6 – दुर्गा पूजा (गंगटोक)
7 – दुर्गापूजा (दशाईं) (गंगटोक)
8 – दूसरा शनिवार आणि मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिन) (भोपाळ, जम्मू, कोच्चि, श्रीनगर आणि तिरुवनन्तपुरम)
9 – रविवार
13 – करवाचौथ (शिमला)
14 – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि श्रीनगर)
16  – रविवार
18  – कटि बिहू (गुवाहाटी)
22  – चौथा शनिवार
23 – रविवार
24 – काली पूजा /दिवाळी/ नरक चतुर्दशी) (गंगटोक, हैदराबाद आणि इंफाल वगळता संपूर्ण देशात सुट्टी)
25 – लक्ष्मी पूजा/दिवाळी/गोवर्धन पूजा ( गंगटोक , हैदराबाद, इंफाल आणि जयपूर)
26 – गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्ष दिवस/भाऊबीज/दिवाळी/लक्ष्मीपूजा (अहमदाबाद, बंगळुरु, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपुर, लखनऊ, मुंबई, नागपुर, शिमला आणि श्रीनगर). 
27 – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दीपावली/ निंगोल चक्कूबा ( गंगटोक, इंफाल, कानपुर आणि लखनऊ)
30 – रविवार
31 – सरदार वल्लभभाई पटेल जयंती, छठ पूजा (अहमदाबाद, रांची आणि पटना)