RBI Madetory Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं (RBI) शुक्रवारी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करण्यात आला. यामध्ये गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी व्याजदरात (Interest Rate) कोणतेही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RBI गव्हर्नर दास यांनी रेपो रेट  6.5 टक्क्यांवर कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. दुसऱ्या तिमाहीमध्ये GDP मध्ये अपेक्षेहून चांगली वाढ पाहत त्याच धर्तीवर सलग पाचव्यांदा रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. आरबीआयच्या या निर्णयामुळं आता रेपो रेटमध्ये कोणतेही बदल होणार नसल्यामुळं वैयक्तिक कर्ज (Personal Loan), वाहन कर्ज (Car Loan) , गृह कर्ज (Home Loan) किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. 


हेसुद्धा पाहा: 3 लाख पाहुणे, तीन राज्यांमध्ये रिसेप्शन; ही IAS अधिकारी होणार भाजपा आमदाराची पत्नी



शक्तिकांता दास यांनी जीडीपीच्या वाढीसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य करत 2024 मध्ये हा आकडा 6.5 वरून 7 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला. शिवाय तिसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी ग्रोथ रेट 6.4 टक्के इतका ठेवला. दरम्यान, यावेळी त्यांनी साखरेच्या दरांमध्ये झपाट्यानं होणारी वाढ हा चिंतेचा विषय असल्याचंही म्हटलं. आरबीआयकडून व्याजाच्या दरात सध्या कोणाताही बदल झालेला नसला तरीही येत्या काळात मात्र बदलाचे संकेत स्पष्टपणे मिळाले आहेत. आरबीआयने शुक्रवारी पतधोरण जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 21 हजाराची पातळी ओलांडली तर सेन्सेक्सही 70 हजाराच्या पातळीच्या आसपास पोहोचला. एका आठवड्यात दुसऱ्यांदा शेअर बाजार 70 हजारांजवळ जाऊन माघारी फिरला.