यामुळे RBI 2000च्या नव्या नोटा बाजारात आणत नाही?
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत गेल्यावर्षी 2000 ची नवी नोट बाजारात आणली. आता
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत गेल्यावर्षी 2000 ची नवी नोट बाजारात आणली. आता
आरबीआयने या 2000 च्या नोटांची छपाई थांबवली आहे. एवढंच नव्हे तर केंद्रीय बँकांनी देखील या एवढ्या मोठ्या रक्कमेची नोट देखील बाजारात आणनं बंद केलं आहे. देशाच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक एसबीआयच्या एका रिसर्च रिपोर्टमध्ये ही गोष्टी समोर आली आहे.
काय आहे यामागचं खरं कारण?
आरबीआयने लोकसभेत सादर केलेल्या रिपोर्टनुसार, एसबीआय इकोफ्लॅशच्या रिपोर्टप्रमाणे केंद्रीय बँकांनी 8 डिसेंबक 2017 पर्यंत 15,78.700 करोड रुपयांची मूल्याच्या नोटा छापल्या ज्यातील 2,46,300 करोड रुपयांची नोटा बाजारात आलेल्या नाहीत.
या आधारावर एसबीआय ग्रुपच्या चीफ इकॉनॉमिक अॅडवा.झर सौम्या क्रांतीने अशी शक्यता वर्तवली आहे की, आरबीआयकडून 2000 च्या नोटांची छपाई थांबवली जाऊ शकते. आरबीआयकडून 2,463 अरब रुपयांच्या 2000 च्या नोटा छापण्या ऐवजी 50 आणि 200 च्या नोटा छापण जास्त गरजेचं आहे.
रिपोर्टनुसार, 2000 च्या नोटा बाजारात सुट्टे मिळवणं कठीण होतं. सुट्ट्या पैशांच्या समस्येमुळे आता आरबीआयने 2000 च्या नोटांची छपाईच बंद केली आहे. नोटबंदीनंतर केंद्रीय बँकेने पैशांचा तुटवडा जाणवू नये म्हणून 2000 ची जास्त छपाई केली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार आणि आरबीआय देशात छोटी करन्सी देखील चलनात ठेवू इच्छिते. आणि त्याचा समावेश हा 35 टक्के असणार आहे.