RBI Monetary Policy: मागच्या महिन्यात आरबीआयकडून मोठ्या प्रमाणात रेपो रेटमध्ये (EMI AND REPO RATE) वाढ करण्यात आली त्यामुळे सध्या सगळ्यांनाच यामुळे जास्त इएमआय भरावा लागत आहे. त्यामुळे सगळेच याबाबत त्रस्त आहेत. ही महागाई कधी कमी होणार आणि आपल्याला कधी दिलासा मिळणार याच्या प्रतिक्षेतच सगळेच आहे. त्यामुळे सगळ्यांना आता उत्सुकता लागली आहे की आरबीआयकडून कधी मोठी घोषणा होते आहे. परंतु तज्ञांकडून असं संकेत मिळत आहेत की लवकरच यानं नेटकऱ्यांना  (RBI) दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जाणून घेऊया की नक्की तज्ञ काय म्हणत आहेत आणि तुमचा इएमआय कधी कमी होणार? (rbi monetary policy will rbi going to reduce its repo rate how much emi will reduce)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, असे कळते की, यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून महागलेल्या कर्जातून दिलासा मिळू शकतो. आर्थिक वाढ मंदावल्याचे चिन्ह अधिक दिसते आहे. परंतु आता येत्या आरबीआयकडून व्याजदर ऑगस्टपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार, या जानेवारी महिन्यापासून महागाईचा (Inflation) दर हा कमी झाला आहे. अन्नधान्यातील महागाईही कमी झाली आहे. चलनदरवाढीही 7 टक्क्यांवरून 2 ते 6 टक्क्यांवर आला आहे. सध्या असे सकारात्मक बदल होत असल्यानं आता व्याजदरातही घट दिसते आहे. त्यामुळे इएमआयमधूनही तुम्हाला चांगली सुटका मिळण्याची शक्यता आहे. 


सध्या देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे? 


मागच्या महिन्यात रेपो रेट (Repo Rate) हा 4 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत गेला होता. मागच्या वर्षी रेपो रेट हा पाच वेळा वाढवला होता त्यामुळे महागाईच्या पार्श्वभुमीवर सरकारलाही अत्यंत कठोर निर्णय घ्यावे लागले होते. त्यातून इएमआयमध्येही लक्षणीय वाढ झाली होती. सध्या फेब्रुवारी 2023 पर्यंत हे रेट्स कमी होण्याची शक्यता दिसते आहे. हा रेट पुढच्या महिन्यापर्यंत 0.25 बेसिस पॉईंट्सनं वाढू शकतो, आरबीआयनं डिसेंबरच्या सुरूवातीला 0.35 बेसिस पॉईंट्सनं वाढवला होता. 


हेही वाचा - Nylone Kite : नायलॉनच्या मांज्यानं केला घात; 7 वर्षांच्या मुलीच्या मानेवर पडले 26 टाके


सध्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर (Indian economy) मोठी आव्हानंही आहेत. वाढत्या महागाईचा प्रश्नही सतावणारा आहे. त्यातून आरोग्य क्षेत्रातही अनेक बदल होताना दिसत आहेत. अशा पार्श्वभुमीवर सध्या मोठे निर्णय घेणं हे सरकारलाही प्राप्त ठरणार आहे. येत्या काळात विकासदरही (GDP India) सुधारण्याची शक्यता आहे. तर काहींना पुन्हा विकासदारावर परिणाम होणार असल्याचे म्हणले आहे. त्यातून आता लवकरच फेब्रुवारी महिन्यात बजेट (Union Budget 2023) सादर केले जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे त्या बजेटकडे आहे. येत्या वेळी केंद्र सरकार कोणते मोठे निर्णय देणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.