मुंबई : RBI Repo rate: पुढील आठवड्यात होणाऱ्या MPC बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा प्रमुख व्याजदर वाढवू शकते. एका अमेरिकन ब्रोकरेजने सांगितले की RBI आणखी 0.35 टक्के व्याजदर  टक्क्यांपर्यंत वाढवू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार्‍या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकी बाबत बोफा सिक्युरिटीजने सांगितले की, RBI या वेळी "calibrated tightening" करून व्याजदर वाढवेल.


महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या दोन पतधोरण आढावा बैठकांमध्ये आरबीआयने एकूण व्याजदरात 0.90 टक्के  वाढ केली आहे.


आरबीआयने मुदत ठेव सुविधा सुरू केल्यापासून एप्रिलपासूनच्या धोरणात्मक कृतींचा संदर्भ देत ब्रोकरेजने सांगितले की, मध्यवर्ती बँकेने प्रभावीपणे 1.30 टक्क्यांनी दर वाढवले ​​आहेत.


रेपो दर किती वाढणार?


ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही पाहत आहोत की आरबीआय आपल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करू शकते, ज्यामुळे तो 5.25 टक्के होईल, जो कोरोना महामारीपूर्वीच्या स्थरापेक्षा जास्त आहे. 


गेल्या आठवड्यात, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, हेडलाइन महागाई, जी एप्रिलमध्ये 7.04 टक्क्यांवर होती, ती आता शिखरावर आहे.


व्याजदरात जास्त वाढही शक्य


ब्रोकरेजने सांगितले की जर पतधोरण समितीने (RBI MPC Meet) अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली तर व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढू शकतात. 


कर्ज आणि हप्त्यांचे व्याज वाढणार


रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढवण्याचे धोरण सध्या स्वीकारले असून, गेल्या दोन पतधोरण बैठकांमध्ये रेपो दरात एकूण 0.90 टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्जाचे हप्ते आणखी वाढले आहेत. ज्याचा थेट परिणाम कर्जदारांच्या खिशावर होत आहे. RBI ने आणखी व्याजदर वाढवल्यास, कर्ज आणखी महाग होतील.