Bank FD Rules : आरबीआयचा एफडीबाबत मोठा निर्णय, आत्ताच जाणून घ्या
एफडीत (fixed deposit) गुंतवणूक करण्याआधी आरबीआयच्या नव्या नियमांबाबत जाणून घ्या, ज्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही.
मुंबई : उज्जवल भविष्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक (Investment) करत असतो. तुम्हीही जर एफडीत (fixed deposit) गुंतवणूक केली असेल किंवा करणार असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एफडीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमांची अंमलबजावणीही करण्यात आली आहे. त्यामुळे एफडीत गुंतवणूक करण्याआधी आरबीआयच्या नव्या नियमांबाबत जाणून घ्या, ज्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. आरबीआयने नुकतंच रेपो रेट्सच्या दरात वाढ केली. त्यानंतर आता बँकांनीही एफडीच्या व्याजदरात वाढ करायला सुरुवात केली आहे. आरबीआयने नियमांमध्ये बदल केला आहे. (rbi reserved bank of india chanegs rules for fd fixed deposit know details)
नियम काय आहे?
एफडीच्या मुदतीनंतरही गुंतवणूदाराने जर त्या संबंधित रक्कमेबाबत दावा केला नाही, तर गुंतवणूकदाराला कमी व्याज मिळेल. हा व्याज दर बचत खात्यावर मिळणाऱ्या दरापेक्षाही कमी असेल. हा निर्णय सर्व प्रकारच्या बँकांना लागू असणार आहे.
समजा तुम्ही 5 वर्षांसाठी एफडी केली आहेत. या एफडीचा 5 वर्षांची मुदत पूर्ण झाली. मात्र त्यानंतरही गुतंवणूकदाराने गुंतवलेल्या रक्कमेसाठी दावा केला नाही, तर नुकसान झालंच समजा. अशावेळेस बँक 2 मुद्दे लक्षात घेणार. एक म्हणजे त्या एफडीवर देण्यात येणारा व्याजदर आणि दुसरा म्हणजे बचत खात्यावर देण्यात येणार व्यादर. या दोन्हीपैकी ज्याचा व्याजदर कमी असेल, त्या दराने तुम्हाला रक्कम दिली जाईल.
सध्या काय नियम आहे?
गुंतवणूकदाराने जर एफडीवर दावा केला नाही, तर बँक आपोआप तितक्याच कालावधीसाठी पुर्नगुंतवणूक करायची. मात्र आता असं होणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनो वेळीच रक्कमेवर दावा करा आणि नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.