मुंबई : भारतीय रिझर्व बँकेने बँकेत (Reserve Bank of India) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पीटीआयने दिलल्या माहितीनुसार, न्यूज एजंसी पीटीआयच्या मते, बँकांमध्ये संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या लोकांना प्रत्येकवर्षी कमीत कमी 10 दिवसांच्या सरप्राइज सुट्ट्या (RBI Unexpected Leave Rule) दिल्या जातील. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना या तारखांबाबत किंवा काळाबाबत माहिती नसणार आहे. अचानक बँकेतर्फे सुटीची ऑफर दिली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमर्शिअल बँकांच्या शिवाय ग्रामीण विकास बँक आणि सहकारी बँकांमध्येही हे नियम लागू केले जातील. या नियमानुसार प्रत्येक  वर्षी कमीत कमी 10 वर्किंग डे कर्मचाऱ्याला अचानक सुटी दिली जाईल. भारतीय रिझर्व बँकेने बँकांना दिलेल्या आपल्या नोटीसमध्ये विवेकपूर्ण जोखिम प्रबंधन उपाय अंतर्गत धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


सरप्राइज सुट्यांमध्ये बँकांचे काम करण्याची गरज नाही
सुट्टीवर असणाऱ्या स्टाफला कॉर्पोरेट ईमेल सोडून फिजिकल किंवा व्हर्चुअल कोणत्याही प्रकारचे काम देण्याची परवानगी बँकांना नसेल. 


बँकांच्या संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरप्राइज सुटी (surprise leaves) बाबत धोरण तयार करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.


बँकांसाठी सहा महिन्याची वेळ
बँकांना त्यांच्या निर्देशक मंडळने धोरण तयार करून संवेदनशील पदांच्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  यासाठी RBI ने बँकांना सहा महिन्याची वेळ दिली आहे. 


RBI च्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या तणावातून दिलासा मिळणार आहे.