मुंबई : वर्षभरापूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर छोट्या नाण्यांनाही चलनातून बाहेर टाकण्यात आलं आहे. या सार्‍यातच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एक नवा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार, आता लवकरच 350 नाणं बाजारात येण्याची शक्यता आहे. याकरिता पूर्ण तयारी झाली आहे. सामान्य जनतेसाठी 350 रूपयांचं नाणं बाजारात येणार आहे. 


गुरू गोविंद सिंह महाराजांच्या 350 व्या प्रकाशोत्सवानिमित्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयकडून लवकरच 350 व्या प्रकाशोत्सवानिमित्त नवं नाणं बाजारात येणार आहे. केंद्रीय बॅंकेकडून अनेकदा खास प्रसंगी अशाप्रकारची नाणी बाजारात आणली जातात. आरबीआयदेखील लवकरच 350 रूपयांचं नाणं अल्प कालावधीसाठी बाजारात आणणार आहे. 


काय आहे नाण्याची खासियत ? 


इकोनॉमिक्स टाईम्सने प्रकाशित केल्या बातमीनुसार, 350 रूपयांचं बाजारात येणारं नाणं 44 एमएमचं असणार आहे. हे नाणं चांदी, तांबं, निकेल आणि झिंक यांनी बनलेलं असेल. नाण्याच्या समोरच्या बाजुला अशोक स्तंभ असेल, त्याखालोखाल सत्यमेव जयते असे लिहलेले असेल. नाण्याच्या दोन्ही बाजुला इंग्रजीत 'इंडिया' आणि देवनागरीत 'भारत' असं लिहलेलं असेल. नाण्यावर 350 आणि रूपयांचं चिन्हदेखील दिसणार आहे. 


वजन 35 ग्राम  


आरबीआयच्या नोटिफिकेशननुसार, नाण्याच्या मागच्या बाजूला हरमिंदरजी पटना साहिब तख्तचा फोटो असेल. नाण्यावर 'श्री गुरु गोबिंद सिंह जी का 350वां प्रकाश उत्सव' असे इंग्रजी आणि देवनागरीमध्येही लिहलेलं असेल. नाण्यावर दोन्ही बाजूला 1666 आणि 2016 लिहलेलं असेल. नाण्याचं वजन 34.65  ते 35.35 ग्राम इतके आहे. मात्र 350 रूपयांचे नाणे किती असतील याबाबत  खुलासा करण्यात आलेला नाही.   


 कोणते धातू किती प्रमाणात ? 
 
चांदी - 50 %
तांबे - 40 %  
निकेल - 5 %  
झिंक - 5 %