मुंबईः आधीच महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. लवकरच RBI कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


देशातील महागाई सातत्याने वाढत आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर हा 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील महागाईचा गेल्या 8 वर्षांतील उच्चांक गाठला आहे


कोरोनानंतरचं आर्थिक संकटातून सर्वसामान्य सावरत असतानाच महागाईने जोर धरला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथमुळे सप्लाय चेन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. परिणामी, बड्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. 



वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारतातही रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी  व्याजदरात वाढ केली होती.  आता यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला RBI आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.



येत्या काही महिन्यात रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक येत्या 7 ते 8 महिन्यात पावलं उचलू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.


एप्रिल महिन्यातल्या महागाईच्या भडक्याचं कारण या व्याजदरवाढीसाठी देण्यात आलं. आता पुढची दरवाढ तब्बल 0.75 टक्के होण्याची भीती बाजारात व्यक्त होत आहे. खरंच असं झालं तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लागणारं भांडवल महाग होईल. त्यामुळे विकासदराला खिळ बसेल, असे विश्लेषकांचं मत आहे.


महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका टप्प्यावर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात धोरणात्मक बदल करायला हवे असंही बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं होतं.