नवी दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) 100 रुपयांची (Rs.100 Currency) नवीन नोट आणणार आहे. याची विशिष बाब म्हणजे नोट चमकदार असणार आहे. ही नोट टिकाऊ असेल. मोठ्या प्रमाणात ही नोट भारतीय चलनात आणण्यात येणार आहे.


ना फाटू शकते ना भिजू शकते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RBI ने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये म्हटले की, वार्निश पेंट असल्याने नोट फाटणार नाही. तसेच पाण्याने भिजणार नाही. या नोटेला जपून ठेवण्याची गरज भासणार नाही. रिझर्व बँकेला दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांना रिप्लेस करावं लागतं. जगातील अनेक देश प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करीत आहेत. 


दृष्टीबाधितांसाठी नोटांमध्ये बदल


या नोटेची डिझाईन विशेष असणार आहे. जेणेकरून दृष्टीबाधितांना नोटेची ओळख होऊ शकेल.  त्यासाठी नोटेची क्वॉलिटी उत्तम असण्यासाठी आरबीआयने मुंबईमधील बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरीची स्थापना केली आहे.