नवी दिल्ली : आपल्या प्रत्येकाचं बँकेत अकाऊंट असतं. बँकेकडून अनेकदा ग्राहकांना एसएमएस येतात. याच संदर्भात एक महत्वाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे. यासाठी आरबीआयकडून ग्राहकांना एसएमएस पाठवले जात आहेत. या SMS मध्ये आर्थिक व्यवहार आणि RBI संदर्भात महत्वाची माहिती ग्राहकांना दिली जात आहे.


तुम्हालाही आरबीआयकडून एसएमएस आला आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. तर, तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.


फोन कॉल्स, SMS च्या माध्यमातून अनेकदा नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे लक्षात घेऊनच केंद्रीय बँकांकडून बँकेच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी 'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.


या मोहीमेअंतर्गत ऑनलाईन सुरक्षीत व्यवहार करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारा दरम्यान होणाऱ्या फसवणुकीसाठी वाचण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. यासाठी आरबीआयकडून ग्राहकांना मोबाईलवर SMS पाठवले जात आहेत.


ग्राहकांना सावध करण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यासोबतच एक नंबरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नंबरवर तुम्ही मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला बँकांचे नियम आणि सुविधांच्या संदर्भात माहिती या माध्यमातून देण्यात येईल. आरबीआयची अशा पद्धतीने जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यात येतील. तुम्हालाही आरबीआयचा एसएमएस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.