मुंबई : भारतात कोरोनावर उपचार म्हणून लसीकरण सुरु करण्यात आले, परंतु इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला लसींचा पूरवठा करणे लस उत्पादन कंपनीला शक्य नव्हते. त्यामुळे लसीकरणाला काही काळासाठी भारतातील काही भागात थांबवले गेले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्या कारणामुळे लसीकरणाचा वेग वाढवला गेला पाहिजे. या दृष्टीकोनातून भारत सरकारकडून एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. यामध्ये रशियाच्या कोरोना लस स्पुतनिकला भारताता वापरता येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि भारतीय औषध निर्माता पॅनासिया बायोटेक यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय औषध निर्माता पॅनासिया बायोटेकने तयार केलेली स्पुतनिक लसची पहिली खेप प्रथम रशियाच्या स्पुतनिक सेंटरला पाठविली जाईल. तेथे त्याची गुणवत्ता तपासणी केली जाईल. त्यानंतर रशियाच्या स्पुतनिक सेंटरचा हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर ही लस भारतीय बाजारात लसीकरणासाठी उपलब्ध केली जाईल.


ही कोरोना लस हिमाचल प्रदेशच्या बड्डी येथे तयार केली जाईल. जर सगळं काही ठीक असेल, तर उन्हाळ्याच्या शेवटीपासून या लसीचे पूर्णपणे उत्पादन सुरवात करण्यात येईल.


आरडीआयएफ (RDIF) आणि पॅनासिया बायोटेक स्पुतनिकचे दरवर्षी 10 कोटी डोस तयार करेल


एप्रिलमध्येच हे उघड झाले होते की, रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि भारतीय औषध निर्माता पॅनासिया बायोटेक संयुक्तपणे भारतात स्पुतनिक कोरोना लस तयार करणार आहेत.


आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी किरिल्ल डमित्रिव म्हणाले, "पॅनासिया बायोटेकबरोबर भारतात उत्पादन सुरू करणे ही देशाला साथीच्या रोगासोबत लढायला मदत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे." त्यांनी असे ही सांगितले की, ते एकत्रीत पणे वर्षभरात 10 कोटी डोस तयार करतील.


लस उत्पादन सुरू करण्यावर पॅनासिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन म्हणाले, "स्पुटिनाक-व्ही च्या निर्मितीला सुरवात करणे, हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही आशा करतो की, आरडीआयएफ सोबतच्या या लसीच्या उत्पादनाने देशातील लोकांना मदत मिळेल आणि त्यांचे आयुष्य पूर्ववत होईल."


भारतात आता तीन कोरोना लस मंजूर


कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर, स्पुतनिक- व्ही ला देखील भारतात वापरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी 12 एप्रिल 2021 रोजी देण्यात आली. त्यानंतर 14 मे रोजी रशियन कोरोना लसीपासून लसीकरण सुरू झाले. सध्या डॉ. रेड्डी लॅब्स देशातील निवडक ठिकाणी स्पुतनिक लस देत आहेत.