Viral News : आयुष्यात कधी काय घडेल याची कोणालाही कल्पना नसते. जेव्हा चित्रपटातील स्टोरी रिअर लाइफमध्ये उतरते तेव्हा आपण सगळेच शॉकमध्ये असतो. असाच काहीसा प्रकार एका कुटुंबात घडला. तुम्हाला नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा बधाई हो (Badhaai Ho) चित्रपट आठवडतो का? कारण रिअर लाइफमध्ये बधाई हो! घडला आहे. (Real life Badhaai Ho 23 year old girl gets a call your 47 year old mother is pregnant arya parvathi Shock viral news on Social media)


रिअर लाइफ बधाई हो!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 वर्षीय तरुणी ही तिच्या कुटुंबाची एकुलती एक लेक...पण त्या एका फोन कॉलने तिच्या आयुष्याची दिशाच बसली. आई वडिलांचा त्या बातमीने तिला धक्काच बसला. 47 वर्षींची आईने लेकीला फोन केला. तेव्हा ती रडत होती, तिने लेकीला सांगितलं आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे. त्याला काही कळतं नव्हतं. कारण ही बातमी कळल्यावर तू काय रियाक्ट होशील ते आम्हाला माहिती नव्हतं. 


शेवटी वडिलांनी सांगितलं की तुझी आई 8 महिने प्रेग्ननंट आहे. हे ऐकून मी निशब्द झाली. काही दिवसांनी मी घरी गेली, तेव्हा मी तिच्या मांडीवर डोक ठेवून खूप रडली. त्यावेळी मी आणि आई एकत्र वेळ घालू लागलो. त्यावेळी तिने हे कसं घडलं ते सांगितलं.




ती म्हणाली की, एक दिवस मी आणि तुझे बाबा मंदिरात गेलो होतो. तिथं मला अचानक चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडली. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तर डॉक्टरांनी मी गर्भवती असल्याचं सांगितलं. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी मी 7 महिने प्रेग्ननंट होती. 


आईची मासिक पाळी थांबली होती. तिला जरा फुगल्यासारखं वाटतं होतं पण आपण गर्भवती असू असं तिला मुळीच वाटलं नाही. कारण बेबी बंपही दिसतं नव्हता. तिला वाटलं की रजोनिवृ्त्तीमुळे ही लक्षण असतील. पण डॉक्टरांनी सांगितलं ती आई होणार आहे. तर हा एक चमत्कारच वाटला. 


मी अनेक वेळा विचारल केला या गोष्टींनी मला लाज वाटली पाहिजे का? तर माझ्या मानाने उत्तर दिलं का वाटली पाहिजे. कित्येक दिवसांपासून मला हेच तर हवं होतं. मलाही कोणीतरी ताई म्हणारं आपलं हक्काचं व्यक्ती. हळूहळू आम्ही कुटुंबातील लोकांना आणि मित्रपरिवाला या बातमीबद्दल सांगितलं. 



ही रिअर लाइफ बधाई हो स्टोरी केरळमधील अभिनेत्री आणि नृत्यांगना आर्या पार्वती हिची आहे.  तिने सोशल मीडियावर फोटो टाकत आपण मोठी बहीण झाल्याचं सांगितलं. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.