CRPF मध्ये कोणत्याही लेखी परिक्षेविना थेट मुलाखतीद्वारे भरती; अर्ज करण्यासाठी जाणून घ्या
केंद्रीय रिझर्व पोलीस दलाने (CRPF) मेडिकल अधिकारी GDMO पदासाठी अर्ज मागितले आहेत.
CRPF Recruitment 2021 : केंद्रीय रिझर्व पोलीस दलाने (CRPF) मेडिकल अधिकारी GDMO पदासाठी अर्ज मागितले आहेत. या भरतीची अधिकृत सूचना crpf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांना 13 मे रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. ही भरती पुणे, हैद्राबाद आणि देशभरातील ठिकाणी 54 जागांसाठी होणार आहे.
सर्व ठिकाणी मुलाखती एकाच तारखेला आणि त्याच वेळी आयोजित करण्यात येणार आहे. मुलाखती सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. उमेदवारांनी संबधित कागदपत्रांची मूळ प्रत तसेच फोटोकॉपी सोबत आणणे गरजेचे आहे.
जीडीएमएओ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएसची डिग्री असणे गरजेचे आहे. या पदांसाठी वयाची मर्यादा 70 वर्ष इतकी आहे.
या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने होणार आहेत. ज्याचा कार्यकाळ 1 वर्षे इतका असणार आहे. त्यांसाठी पीएफ, पेंशन, ग्रेच्युटी, पदोन्नती सारखे सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही.