लाल किल्ला दहशतवादी हल्ला: आरोपी बिलाल अहमदला १८ वर्षांनी अटक
दिल्ली पोलीस आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे दहशतवादी बिलाल अहमद याला अटक केली आहे.
नवी दिल्ली : २००० साली दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना १७ वर्षांनी यश मिळाले आहे.
दिल्ली पोलीस आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे दहशतवादी बिलाल अहमद याला अटक केली आहे. लाल किल्ल्यावरील हल्ल्यात सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
'कावा' फरार
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने दिल्ली पोलिसांना यासंबधी माहिती दिली होती. बिलाल म्हणजेच 'कावा' याला श्रीनगर येथून दिल्लीत येत होता.
याप्रकरणी त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.
काश्मीरमध्ये लपला
बिलाल हा काश्मीरमध्ये लपला होता, गुजरात पोलिसांची त्याच्यावर नजर होती असे पोलीस उपायुक्त कुशवाह यांनी सांगितले.
पोलिसांना बिलाल बद्दल सूचना मिळताच दिल्ली पोलीस एअरपोर्ट येथे रवाना झाली. ३७ वर्षीय बिलाल 'लश्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे म्हटले जात आहे.
११ आरोपी अटकेत
२२ डिसेंबर २००० साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात २ जवान आणि ३ नागरिक मारले गेले. याप्रकरणी ११ आरोपी पकडले गेले.
सेशन कोर्टने त्यांना शिक्षा सुनावली होती. हा हल्ला घडवून आणण्यासाठी ३० लाखाहून अधिक रक्कम ट्रान्स्फर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.