रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : एमपीएससी तसेच विविध बॅंकांच्या परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. या परिक्षार्थींना आता आपल्या स्थानिक भाषेतही परिक्षा देता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 प्रादेशिक ग्रामीण बॅंकांच्या परीक्षा आता मराठी भाषेतही देता येणार आहेत. निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत यासंदर्भात घोषणा कोली आहे. देशभरात १३ प्रादेशिक भाषेत परिक्षा देता येणार आहेत. याआधी प्रादेशिक ग्रामीण बॅंकाच्या परिक्षा इतर भाषेत होत असतं. अशा अनेक तक्रारी स्थानिक परिक्षार्थींच्या असतं. पण आता निर्मला सीतारमन यांच्या घोषणेमुळे असंख्य परिक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.