Stop! कोणाकडेही `या` गोष्टी चुकूनही शेअर करू नका... अन्यथा आयुष्यभर पाश्चात्ताप करावा लागेल
Relationship Alert: समाजात वावरताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील एक गोष्ट म्हणजे तुम्ही कोणासोबत काय शेअर करतायत हेही महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया काही टीप्स.
Things You Should Never Share With Anyone: अनेकदा आपल्याला माणसांमध्ये वावरताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. कोण आपल्याशी कसं बोलतं आहे? आपल्याची नीट वागत आहे का? आपल्याला अमुक एक व्यक्ती त्रास तर देत नाही ना? असे एक नाही तर अनेक प्रश्न आपल्या ओळखीच्याच काय तर अनोळखी व्यक्तींवरूनही पडत असतात. त्यामुळे आपल्याला कायमच सतर्क राहण्याची गरज असते. त्यातून कधी कोण आपल्याबद्दल दुसऱ्याला काय सांगेल याबद्दलही काहीच साशंकता नसते. आपण लोकांशी काय बोलतो त्याचा दुसरीकडे काय विपर्यास होईल याचीही काहीच शाश्वती देता येत नाही. (Relationship advice do not share these things with anyone otherwise you will face major consequences)
त्यामुळे कोणाकडे काय बोललं पाहिजे याचा विचारही करणं आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण अनेकदा आपण कोणाबद्दल काय बोलू याचाही काही नेम नसतो आणि कोण आपल्याबद्दलही काय बोलले याबद्दलही आपण काही करू शकत नाही.
परंतु नात्यांमध्ये (Relationships) आपल्याला या गोष्टींची फार काळजी घ्यावी लागते. नात्यांमध्ये आपण कोणालाही दुखावू शकत नाही आणि त्याचबरोबर आपण दुखावले जाऊ नये अशीही आपल्याला अपेक्षा (Expectations) असते. त्यातून मग ती शाळेतील मैत्री (Friendships) असो, सोसायटीमधील असो अथवा परिवारातील असो वा बाहेरील विश्वातील कुठलीही... आपल्याला आपल्या नात्यात आपल्या एकमेकांशी संबंध (Relationship) चांगले राहावेत याचीच काळजी घेणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया की कोणाशीही बोलताना आपण कोणत्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी शेअर करू नयेत ज्यानं आपले रिलेशन्स खराब होणार नाहीत.
समाजात अनेक प्रकारची लोकं असतात परंतु माणसांमधील एक गुणधर्म हा कायम असतो आणि तो म्हणजे गॉसिंपिंग (Gossips). आपण दुसऱ्यांबद्दल गॉसिंपिंग करतो तेव्हा आपल्याला आपल्या चुकाही कधी कळतं नाहीत. आपण त्या अस्तित्वातच नसतात असा विचार करतो परंतु तसं नसतं जेव्हा तुम्ही इतरांबद्दल बोलता तेव्हा तुमच्याबद्दलही बाहेरच्या जगात तुम्हाला ओळखणारी अथवा न ओळखणारी लोकंही तुमच्याबद्दल गॉसिंपिंग करत असतात.
शेअरिंग म्हणजे काय? आणि ओव्हर शेअरिंग काय असतं? (Difference Between Sharing and Over-Sharing)
शेअरिंग म्हणजे आपल्याला आपलं मनं कोणासोबत तरी मोकळं करायचं असतं. मग ते कुठल्याही नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल असेल किंवा कोण्या एका व्यक्तीबद्दल आपल्याला जे वाटतं त्याबद्दल असेल. आपलं हे शेअरिंग केवळ तात्पुरता त्रागा, गैरसमज आणि वाईट अनुभव शेअर करण्यासाठी असतो त्यामुळे आपल्याला त्याचा किंवा इतरांना त्रास होत नाही.
ओव्हरशेअरिंग म्हणजे एकप्रकारे गॉसिपचं असते कारण आपण एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जास्त चर्चा करतो आणि त्या व्यक्तींबद्दल चुकीचे मतप्रवाह तयार करतो. त्यामुळे त्यानं वातावरण दुषित होते आणि त्याचा त्रास इतरांनाही होतो त्यातून आपल्यालाही होतो. तेव्हा जाणून घेऊया की आपण कोणत्या गोष्टी शेअर करू नयेत? आणि त्या कोणत्या किती कराव्यात?
1. आजच्या जगात आपण कोणीच कोणावर विश्वास (Trust) ठेवू शकत नाही. त्यामुळे आपण कधी कोणावर कसा विश्वास ठेवू शकतो यावरही आपण ठाम राहू शकत नाही कारण कोण कधी आपली वाट लावायला पाहिलं याचा काहीचं नेम नसतो. तेव्हा आपल्या आयुष्यातील या काही गोष्टी अजिबातच शेअर करू नका.
2. आपल्या आयुष्यातील आपल्या भुतकाळातील (Past Mistakes) चुका अजिबातच शेअर करू नका. कारण त्या शेअर केल्यानं लोकं तुमच्याबद्दल तसाच विचार करायला लागतील. त्यामुळे आपल्याला त्या कुणाकडेही शेअर करणं योग्य ठरणार नाही. मग ते आपले आप्त असतोत वा स्वकीय. तेव्हा काळजीपुर्वक या गोष्टींचा बोलताना विचार करा.
3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घरातील आणि कुटुंबांतील वैयक्तिक मुद्दे (Personal Sharing) कधीही शेअर करू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आपल्या कुटुंबातील कलह हे जर सार्वजनिक झाले तर तुमच्या परिवाराला आणि त्यांच्यातील नात्यातही दुरावा निर्माण होऊ शकतो.
4. लोकांना आपल्या दु:खांचा आणि आपल्या विकनेसचा (Weakness) बाऊ करायला फार आवडतो. त्यामुळे तुम्ही कधीही अशा गोष्टी शेअर करू नका ज्यानं तुमच्या विकनेसचे म्हणजेच तुमच्या दुबळेपणाचे दर्शन होईन. लक्षात ठेवा की लोकं तुमच्याबद्दल फार जजमेंटल (Judgemental) ही असतातच परंतु गॉसिंप तेव्हाच करायला लागतात जेव्हा आपण कोणालातरी आपल्याबद्दल सांगतो. तेव्हा अशा गोष्टींची नेहमीच काळजी घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)