मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिलं जातं. बलाढ्य असं रिलायन्स उद्योग समूहाचं साम्राज्य उभ्या करणाऱ्या अंबानी यांनी कायमच सर्वांना थक्क केलं आहे. आपल्या राहणीमानातून असो किंवा मग जीवनात आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांतून असो, अंबानी यांनी कायम सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील बहुप्रतिष्ठीत आणि बहुचर्चित व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या अंबानी यांचं खासगी आयुष्यही तितकंच लक्ष वेधणारं आहे. 


धनाढ्य व्यक्तींच्या यादीत येणाऱ्या मुकेश अंबानी यांचं एका मुलीशी खास नातं. 800 रुपयांच्या नोकरीवर समाधानी असणारी ही मुलगी दुसरीतिसरी कोणी नसून ती आहे खुद्द त्यांची पत्नी नीता अंबानी.


मुकेश अंबानी यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात पत्नी नीता अंबानी यांनी मोलाची साथ दिली. त्यांचा हा प्रवास अनेक जोड्यांना आदर्श देईल असाच होता. 


देशातील प्रतिष्ठीत जोड्यांच्या यादीत येणाऱ्या मुकेश आणि नीता अंबानी यांच्या सहजीवनाला 36 वर्षे पूर्ण झाली. तरीही हा प्रवास मात्र त्यांच्यासाठी दर दिवशी नवा. 


नीता अंबानी यांची आपल्या मुलासाठी निवड करणारे दुसरेतिसरे कोणी नसून त्यांचे वडील, धीरुभाई अंबानी होते. 



अंबानी कुटुंबात सून म्हणून प्रवेश करण्यापूर्वी तारुणाईच्या दिवसांमध्ये नीता एका शाळेत नोकरी करत होत्या.


असं म्हटलं जातं की, त्यांना 800 रुपये इतका पगार मिळत होता. लग्नानंतरही त्यांनी ही नोकरी सुरु ठेवली होती.


पण, पुढे मुलांच्या जन्मानंर त्यांनी नोकरी सोडत मुलांच्या संगोपनावर पूर्ण लक्ष केंद्रीत केलं.