मुंबई : श्रीमंतीचा गर्व असणारे अनेकजण आपण पाहिले आहेत. मुळात श्रीमंती आणि गर्व या गोष्टी अनेका एकत्रच नांदताना दिसतात. पण काही व्यक्ती मात्र या साऱ्याला अपवाद ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब याच अपवाद असणाऱ्यांच्या यादीत येतं. 


देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या अंबानी यांच्या श्रीमंतीचा आकडा थक्क करणारा. पण, असं असलं तरीही त्यांच्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीमध्ये गर्व दिसत नाही. 


आलिशान आयुष्य जगत असूनही अंबानी अतिशय सर्वसामान्य राहणीमानाला अनेकदा प्राधान्य देतात. 


कुटुंबात मुलांकडून काही चूक झाल्यास त्यासाठीही त्यांनी एक नियम घालून दिला आहे. 


एका कार्यक्रमादरम्यान अंबानी यांनी स्पष्ट केलं होतं, की शक्य त्या प्रत्येक वेळी आपण कोणाशीही उद्दामपणे बोलणार नाही, याची मी काळजी घेतो. 


कोणावरही न रागवण्याचाही ते प्रयत्न करत असतात. असं झाल्यास ते समोरच्या व्यक्तीची तितक्याच विनम्रतेनं माफीही मागतात. 


नीता अंबानी यांनी त्याच मुलाखतीत सांगितलेल्या किस्स्यानुसार एकदा मुकेश यांनी त्यांचा मुलगा आकाशला सुरक्षा रक्षकाची माफी मागण्यास सांगितलं होतं. 


एक दिवस आकाश फोनवर वॉचमॅनशी बोलत होता. तेव्हाच त्याचा आवाज चढला. हे सर्व मुकेश अंबानी पाहत होते. आकाशनं फोन ठेवताच त्यांनी आकाशला खाली जाऊन ताबडतोब वॉचमॅनची माफी मागण्यास सांगितलं होतं. 


आकाशचं चढ्या स्वरात बोलणं त्यांना मुळीच पटलं नाही. माणसानं कायम सर्वांशीच नम्र असावं, असंच त्यांना वाटत असतं. ज्यासाठी ते आग्रही असतात.


मुलांना त्यांच्या श्रीमंतीचा गर्व कधीच होता कामा नये यासाठी मुकेश आणि नीता अंबानी कायम प्रयत्न करत असतात. त्यांच्या या शिकवणुकीमुळे आता त्यांची मुलंही त्याच मार्गावर चालू लागली आहेत.