वडिलांच्या व्यवसायात... ईशा अंबानीच्या एका निर्णयामुळं Reliance समुहाची गणितं बदलणार
Reliance Retail : शेवटी ती मुकेश अंबानींचीच लेक... जाणून घ्या ईशानं नेमका कोणता निर्णय घेतलाय आणि तिच्या या निर्णयाचा परिणाम उद्योगसमुहावर कसा होणार....
Reliance Retail : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील पुढची पिढी, अर्थात त्यांची मुलं मागील काही वर्षांपासून व्यवसायात सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. सर्वच दृष्टीकोनांतून उद्योगसमुहाचा विकास कसा होईल आणि नफा कसा कमवता येईल याच हेतूनं सध्या हा समूह काम करताना दिसत आहे. अशा या रिलायन्स उद्योग समुहात अंबानींची लेक, ईशा हिनंही महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सुरुवात केली आहे.
ईशा अंबानीनं घेतला मोठा निर्णय...
ईशा अंबानीनं रिलायन्स रिटेलसाठी एक मोठा निर्णय घेतला असून, कंपनीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रवासी भारतीयांची मदत घेतली आहे. रिलायन्स रिटेलची ग्रॉसरी चेन आणि ऑनलाईन फॅशन रिटेल बिझनेस AJIO च्या कार्यवाहीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ईशा सध्या प्रयत्न करत आहे.
ET च्या वृत्तानुसार रिलायन्स रिटेलनं युरोप, अमेरिका आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये काम करणाऱ्या प्रवासी भारतीयांना नोकरीवर रुजू करून घेतलं आहे. कार्यपद्धतीमध्ये सकारात्मक बदल आणण्यासमवेत निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी म्हणून ईशानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. नव्या जोमाच्या भारतीय उद्योजकांना हेरत त्यांना मुख्य प्रवाहात आणत व्यवसाय क्षेत्रात उज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करण्याचं काम ही नियुक्त केलेली मंडळी करणार आहेत.
हेसुद्धा वाचा : Shahrukh Khan Birthday : 'गणपती, लक्ष्मीच्या प्रतिमेशेजारी कुराण...' धर्माविषयी शाहरुखचं स्पष्ट मत; Video Viral
रिलायन्स रिटेलच्या एक्झिक्युटीव्हकडून मिळालेल्या माहितीनुसार या कामासाठी साधारण 20 ते 30 प्रवासी भारतीयांना निवडण्यात आलं असून, सप्लाय चेन, फायनान्स, ऑपरेशन्स, कॅटेगरी, इन्वेंट्री मॅनेजमेंट आणि मार्जिनवर ही मंडळी काम करणार आहेत.
व्यवसाय क्षेत्रात दर दिवशी होणारे बदल पाहता या बदलांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम उद्योगधंद्यांवर होत असतो. त्यामुळं या बदलत्या संकल्पना आत्मसाद करत त्या दृष्टीनं त्यासाठी काम करणं अतिशय महत्त्वाचं असल्याचीच बाब अंबानी समुहाकडून हेरली जात आहे. फक्त ईशाच नव्हे, तर अनंत आणि आकाशसुद्धा वडिलांच्या या विस्तीर्ण व्यवसायामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत जबाबदारीनं काम करत या क्षेत्रात पाय घट्ट रोवताना दिसत आहेत.