मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने पुन्हा मोठी डील केली आहे. रिलायन्स रिटेल वेंचरने जस्टडायलमध्ये आपली भागिदारी निर्माण केली आहे. रिलायन्सने सर्विस फर्म जस्टडायलची 40.95 टक्के भागिदारी खरेदी केली आहे. यासाठी रिलायन्सने तब्बल 3497 कोटी रुपये मोजले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स पब्लिक मार्केटमध्ये 26 टक्के अतिरिक्त भागिदारी मिळवण्यासाठी खुली बोली लावणार आहे. दरम्यान दोन्ही कंपन्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. जस्टडायलचे संस्थापक वीएसएस मणी यापुढेही कंपनीच्या सीईओपदी कायम राहतील. कंपनीमध्ये मणी यांची भागिदारी 2787 कोटींची आहे.


1996 मध्ये झाली होती जस्ट डायलची सुरूवात
जस्ट डायल 25 वर्ष जुनी इनफॉर्मेशन सर्च ऍंड लिस्टिंग कंपनी आहे. या कंपनीचे नेटवर्क संपूर्ण देशात पसरले आहे. जस्ट डायलची सुरूवात 1996 मध्ये फोन आधारीत सर्विसच्या स्वरूपात झाली होती. यानंतर कंपनीने स्वतःमध्ये वेळेनुसार बदल केले. जस्टडायलचा संपर्क आज बहुतांश लोकांकडे आहे. याचे ऍप किंवा 8888888888 टोल फ्री नंबरच्या माध्यमांतून लोकांना सहजच माहिती मिळते.